हरियाणा
राज्य...........अजूनही या राज्यातल्या काही
गावांमध्ये मुलगी जन्माला आली की पाप समजतात. मग एक तर गर्भातच स्त्रीची
हत्या होते किंवा मुलगी जन्मली की तिला मारून टाकलं जातं.
अशाच एका हरियाणवी गावात आजच्याच दिवशी १९९० साली एक कन्या जन्माला आली. पण ती जन्मलेली मुलगी त्या मुलीच्या आजीला नको होती. तिने जोर धरला की या मुलीला मारून टाकू. हे काही तिथे नवीन नव्हतं .पण मुलीची आई खंबीर होती. या कुप्रथेच्या नावाखाली तिला आपल्या मुलीचा बळी द्यायचा नव्हता .तिने स्पष्ट नकार दिला, सासूविरुद्ध लढली पण आपल्या मुलीला तिने जगवलंच.
ही मुलगी म्हणजे आपल्या देशाचं नाव जगभरात मोठं करणारी बॅडमिंटनपटू "सायना नेहवाल".
तिच्याकडे असलेलं बॅडमिंटन कौशल्य तिच्या पालकांनी लहानपणीच जाणलं. हरियाणात बॅडमिंटन प्रशिक्षणाची विशेष सोय नव्हती. तेव्हा आपल्या मुलीला चांगलं प्रशिक्षण मिळावं या हेतूने तिचे आईवडील तिला घेऊन हैदराबादला आले आणि तिकडेच स्थायिक झाले.
नेहवाल कुटुंबाचं नाव सायना मोठं करू लागली, ही खरं तर अभिमानाची गोष्ट पण तरीही तिच्या आजीने तिला नात म्हणून स्वीकारलं नाही.
आज सायना आपल्या देशाचं नाव मोठं करत आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याची तिची मनीषा आहे .तिचं हे स्वप्न पूर्ण होवो. तिने तिच्या क्षेत्रातली अनेक शिखरं पादाक्रांत करावीत आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं, हीच सदिच्छा .तिचं वैयक्तिक आयुष्यही सुखासमाधानाचं जावो.

No comments:
Post a Comment