Saturday, 18 June 2016

लाल बहादूर शास्त्री



सन १९६२ च्या युद्धानंतर संपूर्ण देशाचं मनोधैर्य खचलेलं होतं आणि त्यातंच १९६४ साली नेहरूंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांनी पंतप्रधानपदाची सूत्र हातात घेतली. पंतप्रधानपदाचा कार्यकाळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता, देशाने गमावलेलं मनोधैर्य आणि चीन आणि पाकिस्तान यांची भारत सीमेवर असणारी वाकडी नजर आणि त्यात भर म्हणून देशासमोरची आर्थिक समस्या. पण शास्त्री यांनी अतिशय शांतपणे, दूरदृष्टी ठेवून प्रत्येक समस्येवर तोडगा काढला. त्यांच्यासाठी शेतकरी हा अन्नदाता होता आणि सीमेवर लढणारा जवान यावर त्यांचं असीम प्रेम होतं, या दोन्हींच्या जोरावर देशासमोरची प्रत्येक समस्या त्यांनी दूर केली .जय जवान जय किसानम्हणत देशाचा शेतकरी आणि सीमेवर लढणारा जवान यांच्या साथीने देशाला प्रगतीपथावर नेलं.

१९६५ मध्ये काश्मीर ओरबाडून घेण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं आणि त्यावेळी नेहरूंच्या तुलनेत अतिशय उत्तम असं देशाचं नेतृत्त्व शास्त्री यांनी केलं .त्यांच्या जय जवान जय किसानया घोषणेने संपूर्ण देशाचं मनोधैर्य या युद्ध काळात वाढलं आणि देश एकजूट झाला. शास्त्री यांच्या युद्धनीतीला अमेरिकाही घाबरली, त्यांनी लाहोरमधून आपल्या नागरिकांना परत घेऊन जाण्यासाठी काही काळ युद्धविराम करण्याचं अपील केलं .या सगळ्याची कल्पना पाकिस्तानने केलीच नव्हती आणि परिणामतः पाकिस्तानला माघार घ्यावी लागली.

आपणही युद्ध जिंकू शकतो, हा आत्मविश्वास अशा रीतीने सर्वप्रथम शास्त्रींनी भारतीयांच्या मनात निर्माण केला. साधी रहाणी उच्च विचारसरणी, मूर्ती लहान पण कीर्ती महान यांचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अत्यंत आदरणीय पंतप्रधान शास्त्री. स्वच्छ चारित्र्य तसेच पूर्णपणे स्वच्छ देश कारभारी, उच्च नीतीमत्ता असणारे. खरं तर आपल्या देशाचं नशीब थोर की आपल्याला असा प्रामाणिक पंतप्रधान लाभला आणि त्याच वेळी आपल्या देशाचं दुर्दैवही तेवढंच मोठं की तो फार कमी काळासाठी लाभला.

आजचे देशाचे राज्यकर्ते एक नंबरचे स्वार्थी, नालायक, धूर्त या लोकांनी किंचित जरी शास्त्रींच्या गुणांना आत्मसात करायचा प्रयत्न केला तरी या देशाचं भलं होईल. शास्त्री यांच्या मृत्यूनंतर त्यांना मरणोत्तर भारतरत्नपदवी देण्याची मागणी जोर धरू लागली पण देशातील मोठ्या राजकीय घराण्याने याला विरोध केला पण जनतेच्या दबावापुढे या घराण्याला झुकावं लागलं आणि शास्त्रींना मरणोत्तर भारतरत्नही पदवी बहाल करावी लागली.

कामाव्यतिरिक्त दिल्लीत टांग्याने फिरणारे, पंतप्रधान असतानाही कर्ज काढून चारचाकी गाडी घेणारे, देशाचे महान पंतप्रधान शास्त्री. खरं तर लोकशाही पद्धतीने निवडून येणारे शास्त्री हे देशाचे पहिले पंतप्रधान.

अत्यंत आदरणीय पंतप्रधान भारतरत्न श्री. लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरपूर्वक प्रणाम .आज यांच्यासारख्या दूरदृष्टी असणाऱ्या कणखर नेतृत्त्वाची आपल्या देशाला खूप गरज आहे. 




 

No comments:

Post a Comment