सकाळी साधारण ७.३० वगैरे वाजले असतील. Morning Walk वरून घरी येत होते, आज रविवार ना त्यामुळे थोडा उशीर. रस्त्यावर एक ओळखीच्या बाई भेटल्या म्हणून रस्त्यावर
बाजूला त्यांच्याशी बोलत उभी होते.
तेवढ्यात एक मुलगी तिथे आली. व्यायाम करूनच परतत असावी, पूर्णपणे आधुनिक life style च्या त्या मुलीशेजारी थोडे गावातले वाटतील असे साध्या कपड्यातले आई आणि मुलगा येऊन उभे राहिले आणि थोड्या गावठी लहेजामध्ये ते आई-मुलगा आपसात बोलू लागले. तसे त्या मुलीच्या चेह-यावरचे हावभाव बदलले. शी...........कोण शेजारी उभं आहे असं दाखवत ती भराभरा कोणालातरी फोन करू लागली. कोणीतरी तिला तिथे न्यायला येणार होतं आणि उशीर होत आहे म्हणून तिचा जीव वर खाली होत होता .त्यात शेजारी तिच्या ते आई मुलगा उभे, तिच्या दृष्टीने गावंढळ .शेवटी वैतागून तिने परत फोन लावला आणि तुझी bike किती त्रास देते, एक कार घे म्हणतीय तर ऐकत का नाहीस, इथे मला अगदी BUS DEPOT मध्ये उभं असल्यासारखं वाटतंय, असं म्हणत तिने त्या दोघांकडे पाहिलं.
तेवढ्यात तिथे एक कोरी करकरीत honda city गाडी आली आणि त्यात ते आई मुलगा बसून निघून गेले .बसताना त्या मुलाने आपल्या वडिलांना AC बंद करायला सांगितल्याचंही ऐकू आलं. हे बघून ती मुलगी अवाक् झाली. तिचा चेहरा अक्षरशः बघण्यासारखा झाला होता. मोठा धक्का बसल्यावर कसा चेहरा होईल, तसा तिचा चेहरा झाला होता आणि खरं सांगायचं तर ते दृश्य बघून मलाही हसू आवरलं नाही. मग मी पण घरी परतले, त्या माझ्या ओळखीच्या बाई पण तिथून गेल्या.
पण एक गोष्ट मात्र खरी, कोणालाही कोणाच्याही पेहरावावरून judge करू नये, कधीच.

No comments:
Post a Comment