आषाढ शुद्ध प्रतिपदा. टेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी
कुरवपूर, कर्नाटक या क्षेत्री
कृष्णा नदीच्या एका बेटावर जेथे श्रीपाद श्रीवल्लभ यांनी १४ वर्षे वास्तव्य केले होते, त्याच ठिकाणी श्री
टेंबेस्वामी यांना " दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा " या अठरा अक्षरी
मंत्राचा साक्षात्कार झाला. या अलौकिक मंत्रासाठी परमपूज्य श्रीदत्त अवतारी योगीराज
श्री वासुदेवानंद सरस्वती यांचे संपूर्ण दत्त संप्रदायावर थोर उपकार आहेत.
योगीराजांनी दत्तगुरुंवर अनेक
ओव्या, आरत्या, कवनं रचली, यांचं पठण आजही केलं जातं.
गरुडेश्वर येथे नर्मदेच्या
काठी टेंबेस्वामी यांची समाधी आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया
दिगंबरा।। वासुदेवानंद सरस्वती सदगुरु नाथा कृपा करा।।
No comments:
Post a Comment