Tuesday, 28 June 2016

रावण दहन आणि बैजनाथ



आज संपूर्ण देशभर वाईटावर चांगल्याची मात म्हणून 'रावण दहन' करण्याची प्रथा आहे, पण याच आपल्याच देशात आजच्या दिवशी एके ठिकाणी रावण दहन केलं जात नाही.

हिमाचल प्रदेशातील कांगरा जिल्ह्यातल्या "बैजनाथ" नगरात आज रावण दहन केलं जात नाही. या बैजनाथ मधेच रावणाने घोर तपश्चर्या केली होती. शंकराला प्रसन्न करण्यासाठी रावणाने आपल्या डोक्यांची अग्नीत आहुती दिली होती आणि त्यानंतर इथेच शंकर रावणाला प्रसन्न झाले. ्यामुळे या भागाला रावणाचं तपस्थळ मानलं गेलंय .इथे रावणाला राक्षस मानता एक महान भक्त मानलं जातं. या नगरात जे शंकराचं प्रसिद्ध मंदीर आहे, त्यातल्या शिवलिंगाची रावण पूजा करायचा. त्यामुळे शंकराच्या समोरच शंकराच्या महान भक्ताचं दहन या नगरात योग्य समजलं जात नाही.

आजच्या दिवशी कोणाच्याही घरी गोडधोड केलं जात नाही. आजच्या दिवशी सोन्याला महत्त्व आहे पण या नगरात आजच्या दिवशी सराफांची दुकानं बंद असतात.

No comments:

Post a Comment