आपल्या आशियानातली
शेवटची रात्र, आपल्या घरकुलातली शेवटची रात्र, आपल्या स्वप्नातल्या
घरातली शेवटची रात्र..............हो आपलं घर अनधिकृत आहे आणि
ही गोष्ट आम्हाला माहीत आहे. आम्हालाच काय संपूर्ण जगाला माहीत आहे.
पण आपलं घर आपल्याच हातांनी उभं करताना, सजवताना आम्ही ज्या भावना या घरात पेरल्या त्या खूप पवित्र आहेत. या घरात अडकलेल्या आमच्या भावना प्रामाणिक आहेत. घराच्या प्रत्येक कोपऱ्यातल्या कडू गोड आठवणी खऱ्या आहेत .हीच ती जागा जिथे मी माझ्या आयुष्यातला सर्वोच्च सुखाचा क्षण अनुभवला, तेव्हा संपूर्ण घर माझ्या सुखात सहभागी झालं होतं. ती.......ती खोली आहे ना तिथे मी अतीव दुःख काय असतं ते अनुभवलं आणि तेव्हाही हेच घर माझे अश्रू पुसायला, मला धीर द्यायला पुढे आलं होतं.
याच घरात आम्ही भविष्याची स्वप्न रंगवली.......हो याच अनधिकृत घरात. ती स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रयत्नही केले, उद्या कदाचित ती स्वप्न पूर्ण होतीलही पण तो स्वप्नपूर्तीचा आनंद घ्यायला आमचं हे घर नसेल.
या आमच्या घरकुलात रहाण्याची आमची ही शेवटची रात्र, घराशी संवाद साधण्याची ही शेवटची रात्र. उद्या हेच आमचं घर परक्यांच्या ताब्यात द्यायचंय. दिवे लागणीच्या वेळेला देवाजवळ दिवा लावायचा, खोल्यांमध्ये अंधार नको म्हणून दिवे लावायचे पण उद्या हेच दिवे लावण्यासाठी लागणारी वीज या घरात नसेल .बरोबर आहे अनधिकृत घर आहे ना.
यानंतर सुरू होईल या आमच्या स्वप्नाच्या हत्येचा कार्यक्रम, नाही हत्या तर केलीच पाहिजे. ज्या घरात भावना गुंतवल्या, ते घरच अनधिकृत आहे ना ! काही लोकं येतील .आमच्यासाठी सजीव असलेलं घर निर्जीव समजून त्यावर हातोडा मारतील, आणि ही हत्या आम्हाला आमच्या डोळ्यांनी बघण्याशिवाय गत्यंतर नसेल.
हे सगळं कसं बघवणार ? त्यावेळी मनावर होणारा आघात तरी कसा सहन करायचा ? प्रश्न अनेक आहेत, एवढ्या दिव्यातून जाऊनही देवाने आम्हाला जिवंत ठेवलंय म्हणजे या प्रश्नांची उत्तरंही आम्हालाच शोधायची आहेत .पण कशी ? कारण जीवनातले कठीण प्रश्न सोडवायला ज्या छत्राने मदत केली, ते छत्रच आता आमच्याकडे कुठे असणार आहे !

No comments:
Post a Comment