Friday, 17 June 2016

नैतिकता आणि हिंदी सिनेमा



काल रात्री नूतन आणि देव आनंद ह्यांचा 'तेरे घर के सामने' हा चित्रपट पाहिला. चित्रपट या माध्यमाचा खूप मोठा परिणाम समाजावर होतो.

पूर्वीचे चित्रपट जसे सहजसुंदर तसेच भारतीय मूल्य जपणारे होते आणि त्यांचा परिणाम त्या वेळच्या समाजावर तसाच होत असावा. काल पाहिलेल्या चित्रपटातील दोन संवाद त्या काळच्या चित्रपटांचा नैतिकतेच्या दृष्टिने असलेला उच्च दर्जा दाखवतो.

एका प्रसंगात अमेरिकेतून शिक्षण घेऊन आलेला देव आनंद नूतनला म्हणतो, "प्यार में आगे बढना है तो हमें शादी करनी चाहिए" तसेच दुस-या एका प्रसंगात, दोघेही जण एकमेकांच्या आईवडिलांना पसंत असतात पण नंतर दोघांचे वडील कोण आहेत हे एकमेकांच्या घरी नंतर समजतं. दोघे वडील एकमेकांचे वैरी आहेत हे समजल्यावर फक्त या कारणासाठी दोघांचेही वडील लग्नाला विरोध करतात .त्या वेळी नूतन देव आनंदला म्हणते, "मै पिताजी के मर्जी के खिलाफ शादी नहीं करूंगी"

हे दोन्ही संवाद बरंच काही सांगतात. आजचे बहुसंख्य चित्रपट आणि पूर्वीचे चित्रपट यांमधे हाच भारतीय मूल्यांचा खूप मोठा फरक पडलेला दिसून येतो. तसाच फरक त्या काळचा भारतीय समाज आणि आजचा समाज यामधे दिसून येतो.

समाज बदलायला कमी अधिक प्रमाणात या चित्रपटांचा हातभार लागलेला आहेच. आजही भारतीय मूल्य जपणारे दर्जेदार चित्रपट बनतात पण त्यांची संख्या अगदीच नगण्य आहे.

No comments:

Post a Comment