Monday, 20 June 2016

शमशाद बेगम



कही पे निगाहें कही पे निशाना, बूझ मेरा क्या नाम रे, कभी आर कभी पार, मेरे पीया गए रंगून, कजरा मोहब्बत वाला, लेके पहला पहला प्यार, सैंया दिल में आना रे,... यासारख्या कित्येक क्लासिक गाण्यांनी आपली कारकीर्द रंगवणाऱ्या हिंदी चित्रपट संगीताच्या पहिल्या अष्टपैलू गायिकांपैकी एक अशा शमशाद बेगम यांचा आज जन्म दिवस...
 
यांचा आवाज वेगळा होता. आवाज चांगला खोल (depth), थोडा अनुनासिक होता. पाण्याचा झरा कसा वाहत असतो, तसं त्यांचं गाणं वाटतं. सुरेल आणि खळाळत्या आवाजाची त्यांना दैवी देणगी होती. पैंजण कसे छुमछुम वाजतात, तसा त्यांचा आवाज होता.
 
लाहोर रेडिओसाठी त्यांनी पहिल्यांदा लोकांसाठी गाणं म्हटलं. रेडिओवरचा हा आवाज नौशाद आणि ओ. पी. नय्यर यांना फार भावला आणि शमशाद बेगमसाठी बॉलीवूडचे दरवाजे उघडले गेले. काही काळ रेडिओवर काम केल्यावर शमशाद यांनीही मुंबईला येण्याचं नक्की केलं आणि बॉलीवूडला एक नवीन सुरेल गायिका मिळाली.
 
१९१९ मध्ये अमृतसरमध्ये जन्मलेल्या शमशाद यांनी लाहोरमधल्या आपल्या पुराणमतवादी कुटुंबाला सोडून ४० च्या दशकाच्या सुरुवातीला आपली एक वेगळी ओळख बनवण्यासाठी मुंबई गाठली.
ठेक्यात, ठसक्यात आणि तेवढ्याच निर्मळ आवाजात म्हटलेली त्यांची गाणी मनाचा ठाव घेतात आणि ऐकणाऱ्यालाही ठेका धरायला भाग पाडतात.
 
रीमिक्सच्या काळात जर सर्वात जास्त कोणाची गाणी रीमिक्स झाली असतील तर ती शमशाद बेगम यांचीच आणि खुद्द त्यांचाही त्यावर आक्षेप नव्हता.
 
हिंदी चित्रपट संगीतात सुरुवातीच्या काळात आपला एक अमीट ठसा उमटवणाऱ्या या सुरेल गायिकेची ही एक आठवण....


No comments:

Post a Comment