Monday, 20 June 2016

मीना कुमारी



मीना कुमारी, महजबीन बानो, हिचा आज जन्मदिवस. मीना कुमारीचा जन्म एका अतिशय गरीब घरात झाला .तिच्या आईवडिलांचं हे तिसरं अपत्य. मीना कुमारीची आई जेव्हा तिच्यावेळी प्रसूत झाली तेव्हा ही प्रसुती करणाऱ्या डॉ .गद्रे यांना प्रसुतीची फी देण्याएवढेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. मग तिच्या वडिलांनी तिला एका मुस्लीम अनाथाश्रमात सोडून दिलं. हे जेव्हा तिच्या आईला कळलं तेव्हा तिने जी रडायला सुरुवात केली, की तिचं ते रडणं बघून तिच्या वडलांना तिला आश्रमातून परत आणावं लागलं.

वयाच्या सातव्या वर्षी मीना कुमारीने चित्रपटक्षेत्रात पाऊल टाकलं .तिच्या आईच्या आग्रहास्तव तिच्या वडिलांनी तिला या क्षेत्रात आणलं .तिला खूप शिकायचं होतं, अभ्यासाकडे तिचा फार ओढा होता .लहान मीना जिद्दीला पेटली, मला चित्रपटात काम करायचं नाही. मला शाळेत जायचंय, इतर मुलांसारखं मलाही शिकायचंय. पण याचा काहीही उपयोग झाला नाही आणि बेबी मीनाने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी मनाविरुद्ध चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.

मीना कुमारी फक्त एक अभिनेत्री नव्हती. ती एक चांगली उर्दू कवयित्रीही होती. खूप सुंदर अर्थपूर्ण शायरींची रचना तिने केली .त्यातल्या काही शायरी तिने स्वतः गायल्याही आहेत. कधीही आपल्या शायरी तिने प्रकाशित केल्या नाहीत. नज़्म, ग़ज़ल, शेर यांचा संग्रह असलेल्या २५ डायऱ्यांचे सर्वाधिकार तिने मृत्यूनंतर गुलज़ारयांना दिले.

तिने लिहिलेली आणि गायलेली एक ग़ज़ल :

चाँद तनहा है, आसमान तनहा...
दर्द मिला है कहाँ कहाँ तनहा...

बुझ गयी आस, चुप गया तारा...
थरथराता रहा धुआं तनहा...

जिंदगी क्या इसी को कहते हैं?
जिस्म तनहा और जान तनहा...

हमसफ़र अगर कोई मिले भी कहीं,
दोनों चलते रहे यहाँ तनहा...

जलती-बुझती-सी रौशनी के परे...
सिमटा सिमटा सा एक मकान तनहा...

राह देखा करेगी सदियों तक,
छोर जायेंगे ये जहाँ तनहा॥


तिच्या स्वतःच्या आवाजातल्या या ग़ज़लेची लिंक : http://www.youtube.com/watch?v=SfoxlhiIsXY&feature=player_detailpage






सुबह से शाम तलक
दुसरों के लिए कुछ करना है
जिसमें ख़ुद अपना कुछ नक़्श नहीं
रंग उस पैकरे-तस्वीर ही में भरना है
ज़िन्दगी क्या है, कभी सोचने लगता है यह ज़हन
और फिर रूह पे छा जाते हैं
दर्द के साये, उदासी सा धुंआ, दुख की घटा
दिल में रह रहके ख़्याल आता है
ज़िन्दगी यह है तो फिर मौत किसे कहते हैं?
प्यार इक ख़्वाब था, इस ख़्वाब की ता'बीर न पूछ
क्या मिली जुर्म-ए-वफ़ा की ता'बीर न पूछ
- मीना कुमारी
 
हिला खूप शिकायचं होतं पण ते शक्य झालं नाही. इच्छा नसतानाही अगदी लहान वयात रुपेरी पडद्यावर यावं लागलं. पडद्यावर भरपूर यश पाहिलं पण खऱ्या आयुष्यात ही खूप एकाकी, दुःखी होती. या आपल्या भावना ती शायरीमध्ये व्यक्त करायची. अशा शायरींचा मोठा संग्रह तिने आपल्या मृत्यूनंतर गुलज़ार यांच्याकडे सुपूर्द केला आणि या एकाकीपणातच तिने या जगाचा निरोप घेतला.
३१ मार्च हाच तो दिवस..

No comments:

Post a Comment