आपली नावं ही
बहुतेक करून देवदेवतांवरून किंवा पंचमहाभुतांवरून ठेवलेली असतात. कधी नैसर्गिक गोष्टींवरून, इतिहासातल्या पात्रांवरूनही विशेष नामं आहेत. पण यापेक्षाही वेगळी बरीच नावं आपल्याकडे प्रचलित आहेत. त्यातलंच एक नाव
म्हणजे माझंच मंजुषा
मंजुषा म्हणजे संच, संचय, साठा. हा अर्थ मला माहीत होता पण आपल्या नावाची निर्मितीही कोणीतरी केली असेल हे माझ्या डोक्यातही नव्हतं. पण मध्यंतरी हिंदी आणि संस्कृतचे प्रसिद्ध कवी, लेखक आणि गीतकार पंडित नरेंद्र शर्मा यांची त्यांच्या मुलीनेच लिहिलेली माहिती इथे फेसबुकवरच वाचनात आली. त्यांनी काही नावांची निर्मिती केली आहे आणि त्यातील एक मंजुषा हे नाव आहे.
काहीच कल्पना नसताना अचानक हे मी वाचलं आणि वाटलं, अरेच्चा हे असंही असू शकतं ! आपल्या नावाचा निर्माणकर्ताही कोणीतरी असू शकतो ! Great
माझ्या नावाच्या निर्मितीसाठी पंडितजींचे आणि शिवाय त्यांच्या मुलीचे आभार आणि फेसबुकचेही आभार.
आज कमेंट्स मधे अनेक ठिकाणी माझंच नाव वाचून मला एकदम याची आठवण झाली आणि पोस्ट लिहावीशी वाटली.

No comments:
Post a Comment