आज दुपारी एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमधे गेले होते. घरातल्या किरकोळ गोष्टीच
घ्यायच्या होत्या. देशी आणि विदेशी वस्तूंनी खचाखच भरलेल्या त्या स्टोअरमधे
लोकंही ट्राॅलीज भरभरून खरेदी करत होते पण त्यात एक माणूस असा
होता की तो खाण्याशी संबंधित सेक्शन्समधे वस्तू हातात घेऊन न्याहाळताना तर दिसत होता पण प्रत्यक्षात खरेदी काहीच करत नव्हता.
अशा ठिकाणी असाच timepass करायला आलेली लोकं नेहमीच दिसतात, त्यांच्याकडे पाहूनही हे समजत असतं की यांना काहीही इथे घ्यायचं नाहीये पण आज दिसलेला माणूस वेगळा होता .त्याला सामान खरेदी करायचं आहे, हे त्याच्या एकंदर तिथल्या वावरावरून कळत होतं.
नंतर त्याच्या हातात ट्राॅली दिसली, रिकामी. Frozen sections सकट सगळीकडे तो मला दिसला, खरेदी करण्याच्या उद्देशानेच पण शेवटपर्यंत रिकाम्या ट्राॅलीसह.
मी billing counter वर जाण्याआधी जेव्हा शेवटचं त्याला पाहिलं तेव्हा माझं लक्ष माझ्या ट्राॅलीकडेही गेलं. किंमती न बघता मी मला हवं ते खरेदी केलं होतं .हा पदार्थ तो पदार्थ करून बघूया मग त्यासाठी हे घेऊयात ते घेऊयात, असा विचार करणारी मी आणि समोर रिकाम्या ट्राॅलीसह तो माणूस हे पाहून कुठेतरी मनाला वाईट वाटलं.
खरेदी करून मी समाधानी आणि त्याच वेळी तो पूर्णतः असमाधानी .अशा ठिकाणी लोकं कळत नकळत गरज नसणाऱ्या गोष्टीही विकत घेतात पण त्याच वेळी समोर सगळ्या इच्छीत गोष्टी दिसत असतानाही, किमान गरजेच्या वस्तूही विकत घेणं शक्य नसणारी, लोकं तिथेच आपल्याच आजूबाजूला असतात. आपण आपल्याच नादात असतो, या अशा लोकांकडे आपलं लक्ष जातंच असं नाही. पण ही गोष्ट खरोखर खेदाची आहे.

No comments:
Post a Comment