Friday, 17 June 2016

मला न आवडणारे आवाज



मला बरेच आवाज आवडत नाहीत... प्लॅस्टिकच्या पिशवीचा कुरकुर आवाज, रस्त्याने चालताना पाय उचलून न टाकता सरपटत चालल्याने येणारा चपलेचा आवाज(आजारी आणि वयस्कर याला अपवाद), काही खाताना येणारा मिचमिच आवाज आणि परत याला आजारी आणि वयस्क अपवाद...

... पण या सगळ्या आवाजांपेक्षा जर कुठला आवाज मला आवडत नसेल किंवा म्हणा कुठल्या आवाजाची चीड असेल तर तो म्हणजे सकाळी सकाळी येणारा पारव्यांच्या म्हणजेच कबुतरांच्या पंखांचा फट्फट् आवाज. तसा हा आवाज दिवसभर येत असतो पण सकाळी जरा जास्तच येतो.
 
तसा कबुतर हा पक्षी मला अजिबात आवडत नाही. कावळ्यांची चीड येत नाही पण या कबुतरांची फार फार चीड येते आणि त्यात तो पंखांचा आवाज तर थेट डोक्यात जातो माझ्या...

आपले चिमण्या, पोपट, साळुंकी हे असे पक्षी बरे..

No comments:

Post a Comment