Friday, 17 June 2016

तीन पिढ्या आणि त्यांची कर्तव्ये



सकाळी साधारण साडेसात आठच्या सुमारास हमखास दिसणारं चित्र...

ज्येष्ठ नागरीक कुठे बागेत किंवा कुठे रिकाम्या रस्त्यावर मॉर्निंग वॉक घेत आहेत किंवा कुठे आपल्या समवयस्क मित्रांबरोबर गप्पा टप्पा करत आहेत, हा हा हु हु करत आपलं वय एन्जॉय करत आहेत तर कुठे दुधाच्या दुकानात दूध घेण्यासाठी दिसत आहेत.
 
त्याचवेळी त्यांच्या पुढची दुसरी पिढी शाळेच्या बसची वाट बघत किंवा आपल्या शाळेच्या वाटेवर निघालेली दिसत आहे.
 
...आणि त्याचवेळी या दोन पिढ्यांच्या मधली पिढी आपल्या कामधंद्यासाठी बाहेर पडलेली दिसत आहे, आपल्या आधीच्या पिढीची संध्याकाळ सुखकर जावी म्हणून आणि आपल्या पुढच्या पिढीचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करता यावं म्हणून...
 
एकच वेळ आणि तीन पिढ्या... आपापल्या कर्मासाठी, कार्यासाठी घराबाहेर पडलेल्या... भविष्यात भूमिका बदलतील पण हे चक्र असंच चालू राहील आणि रहावं...
 
धन्य आहे ती भारतीय कुटुंब पद्धती...

No comments:

Post a Comment