Friday, 17 June 2016

संध्याकाळ आणि एक विरह



आकाश, आकाशातल्या ढगांच्या रांगा, नदी, समुद्र, पर्वतरांगांसकट सकल सृष्टीचं आणि सूर्याचं अतिशय प्रेमाचं नातं आहे. सूर्यनारायण जेव्हा आकाशात तळपत असतात तेव्हा सकल सृष्टी आनंदाने न्हाऊन निघते, याच आनंदात ती चकचकीत, लखलखणारे सौभाग्यलंकार धारण करते.....

....पण संध्याकाळ होते आणि, सूर्याची आणि या सृष्टीची ताटातूट होण्याची वेळ येते. भास्कर अस्ताला जातो, आणि हा विरह समस्त आकाश, त्यात बागडणाऱ्या मेघमालांपासून धरती आणि त्यावर नांदणारा निसर्ग सहन करू शकत नाही. हे वियोगाचं दुःख सहन न झाल्याने आकाश आणि त्यातील मेघरांगा आपलं सोनेरी सौंदर्य टाकत कृष्णवर्ण धारण करत, तर धरतीवरच्या निसर्गाचा प्रत्येक अंग आपण ल्यालेला शालू, पैठणी टाकून रजनीने दिलेली अंधःकारमयी वस्त्र धारण करत, आपल्या अती प्रिय नारायणाची आतुरतेने एकटक वाट बघत बसतात...

No comments:

Post a Comment