Friday, 17 June 2016

वय वाढताना दिसणारे कलाकार



आयुष्याच्या एखाद्या महत्त्वाच्या टप्प्यावर एखादा मुलगा किंवा मुलगी असताना, म्हणजेच १० वी, १२ वी पास, पुढे महत्त्वाच्या ठिकाणी प्रवेश, वगैरे वगैरे अशा टप्प्यावर असताना आपण एक वाक्य नेहमी ऐकतो.... एवढासा किंवा एवढीशी पाहिली होती आणि आता बघा, ती किंवा तो ना....तिला मी लहानाचं मोठं होताना पाहिलंय.
 
अशा प्रकारची वाक्य आपण नेहमी ऐकतो पण आता त्यात अजून एक भर आणि ती म्हणजे वर्षानुवर्षे चालणाऱ्या मालिकांमधले कलाकार. आपण या कलाकारांच्या बाबतीत ही अशी वाक्य सहजपणे म्हणू शकतो.
 
उदा. तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका. ही मालिका २००८ सालापासून सुरु आहे. त्या मालिकेतली सुरुवातीला अगदी चिमुरडी असणारी मुलं, आता मात्र अगदी वयात आलेली आहेत. त्या मालिकेतली खरं तर सगळीच पात्रं पण प्रकर्षाने बदल जाणवतो तो म्हणजे जेठालाल या पात्रामध्ये. तरणाताठ जेठा आताशा वयस्कर दिसायला लागला आहे.
 
अजून एक म्हणजे CID हा कार्यक्रम. प्रद्युम्न, दया, अभिजीत यांच्यातही असाच फरक जाणवतो.
म्हणजेच थोडक्यात...एखादा बालकलाकार एवढासा पाहिला होता, बघता बघता आता केवढा मोठा झाला किंवा एखाद्या तरुण कलाकाराला मालिकांमध्येच आम्ही वयस्कर होताना पाहिलंय हे आपणही नक्कीच म्हणू शकतो.
 
तसं काही वर्षांनी हे असं फेसबुकवरही प्रत्यक्ष डोळ्यांनी त्या व्यक्तीला न पाहता फक्त फोटो बघूनही अगदी आपण हेच म्हणू शकू !
 
तंत्रज्ञानाने आपल्याला किती जवळ आणलंय नाही !

No comments:

Post a Comment