त्यांच्याकडे दोन पर्याय असतात...
एक म्हणजे,
ज्या धडाडीने पत्रकारितेचा
अभ्यासक्रम पूर्ण केला, त्याच धडाडीने पत्रकारिता करायची. सत्याची साथ सोडायची
नाही
आणि दुसरा म्हणजे,
पैशासाठी आपला आत्माच विकायचा.
आपल्याला जसं आणि जे सांगण्यात येईल तेच करायचं.
खोटं आणि चुकीचं यांच्यावर आपल्या शब्दांचा मुलामा चढवत कोणाच्या तरी हातचा बाहुला बनत राहायचं पण पैसा मात्र रग्गड कमवायचा.
महिन्याला कित्येक लाख अस्से कमवायचे आणि मस्त चकाचक स्टुडिओत बसून
ही सो कॉल्ड पत्रकारिता करायची.
ते दुसरा पर्याय निवडतात कारण
त्यांना पैसा कमवायचा असतो आणि आपल्या आत्म्याशी प्रामाणिक राहून ते
शक्य नसतं. ते भरपूर पैसा कमवायला लागतात पण कधीतरी मनाशी बाळगलेलं स्वप्न, धडाडीने पत्रकारिता करायची, सत्याची साथ सोडायची नाही हे कुठेतरी मनात खदखदत असतं.
(आता हे म्हणू नका की हे असं आजच्या काळात खदखदणं वगैरे
काही नसतं. मी एका वृत्त वाहिनीच्या नावाजलेल्या आणि लोकांनी धुत्कारलेल्या
पत्रकाराला मला नैतिकतेचं विद्यापीठ बनवायचं आहे असं बोलून दाखवलेलं वाचलंय
आणि स्वतःकडे असलेल्या (अर्थातच हिंदू)धार्मिक ग्रंथांचा आणि त्यातल्या
शिकवणीचा उल्लेखही त्यात अग्रक्रमाने केलेला वाचलाय.)
सत्याची साथ सोडली ही खदखद आणि त्याच बरोबरीने सामान्य जनतेचा आपल्याविरुद्धचा
प्रचंड आक्रोश हे दोन्ही सहन करणे हे क्रमप्राप्त ठरते. कारण आपणच आपली
उंच केलेली lifestyle
दिसत असते आणि ती तशीच ठेवायची
तर पैसा हवा आणि तो असत्याच्या संगतीतच असतो.
सोशल मीडियावर लोकं अक्षरशः
तोंडात शेण घालत असतात पण ते ही सहनच करायचं,
कुठे लोकांच्या गर्दीत कोणी
येतो थोबाडीत मारून जातो, शाई, शेण फासून जातो
पण अशा कुठल्याही परिस्थितीत
आपण आपलाच मारलेला आत्मा जपायचा आणि उगाच कांगावा
करायला, नौटंकी करायला सुरुवात करायची. हे सहन करणं कठीण असतं
कारण ती मनात आत खोल अखंड जिवंत असलेली खदखद...
ही खदखद अशीच जपायची कारण ती कोणाकडे तरी गहाण आहे. जेव्हा ही आत्मा मारणारी
नोकरी पत्करली तेव्हाच ती कोणाकडे तरी गहाण टाकली. तिने फक्त मनात रहायचं, बाहेर येण्यास पूर्ण बंदी...
आणि.....आपली उंची लाईफस्टाईल
आणि मिळणारा बक्कळ पैसा यात डुंबत हे असं जगत राहायचं...
I hate
Indian Media...
(आपण ज्या पत्रकारांना उठता बसता शिव्या घालतो, अर्थात त्या योग्यच आहेत...त्यांचं संभाव्य अंतर्मन उलगडण्याचा
हा एक प्रयत्न)
No comments:
Post a Comment