Wednesday, 15 June 2016

भारत आणि पाकिस्तान, यांचा संयुक्त वारसा

ब्रिटीश इंडियात कराची आणि मुंबई हा असा एकत्र बाँबे प्रेसिडेन्सी असा भाग होता. १९११ साली मुंबईच्या थडाणी यांनी कराची येथे बाँबे बेकरी नावाची एक बेकरी सुरु केली. उत्तम केक्स आणि इतर बेकरी पदार्थ मिळण्याचं हे ठिकाण आजही तेवढंच लोकप्रिय आहे.

फाळणीनंतर सिंध प्रांतातून भारतात आलेल्या रमणाणी यांनी १९५३ मध्ये हैद्राबाद येथे कराची बेकरी या नावाने बेकरी सुरु केली. नाव कराची दिलं, काहीही म्हणा आपल्या शहराबद्दल प्रेम हे असतंच ना. फाळणी झाली म्हणून काय झालं ! आज या बेकरीची लोकप्रियता देशभर पसरली आहे.

 म्हणजेच आज कराचीत बाँबे आहे आणि भारतात, अगदी मुंबईतही कराची आहे पण कराची मुंबईपासून वेगळी आहे. दोन देश वेगळे आहेत.

तुम्ही फाळणीच्या वेळी बऱ्याच गोष्टींचे दोन भाग केलेत. एकदम सगळं तोडून टाकलंत पण परंपरागत वारसा जो अखंड भारताचा एकत्र होता, आहे आणि कायम राहील, त्याचं काय ? हे झालं बेकरीचं पण अशा कितीतरी गोष्टी आहेत इकडेही आणि तिकडेही, ज्या दोन्हीकडच्यांनी जतन करून ठेवण्यासारख्या आहेत म्हणजेच पुरातन वारसा आहेत.  

त्या वारशाचं विभाजन तुम्ही कसं करणार ? कधीच करू शकणार नाही.

No comments:

Post a Comment