Monday, 20 June 2016

काजोल



नूतनचा अभिनय वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेणारी नूतनची भाच्ची.............तनुजाचा अल्लडपणा, निरागस चेहरा घेणारी तनुजाची लेक...........समर्थ परिवाराचा अभिनय वारसा पुढे चालवणारी “काजोल”

मुखर्जी-गांगुली परिवाराचं नाव मोठं करणारी.............अभिनेता जॉय मुखर्जीची पुतणी..........गांगुली म्हणजेच अशोककुमार-किशोरकुमार-अनुपकुमार हे गांगुली खानदान. या खानदानाची नात. या तीन भावांच्या बहिणीची नात..... “काजोल”

हा खरं तर खूप कमी जणांचा उल्लेख आहे, या खानदानात अनेक नावाजलेले कलाकार आहेत. समर्थ-मुखर्जी-गांगुली अशा समर्थ खानदानाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या “काजोल”चा आज वाढदिवस. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अतिशय गुणी कलाकार. अतिशय बोलके डोळे.......तिच्या अभिनय गुणाला जास्तच खुलवतात. हिच्या नैसर्गिक अभिनय कौशल्यामुळे काजोलचा उल्लेख बॉलीवूडमध्ये मोठ्या अभिनेत्रींच्या यादीत केला जातो.

करियरच्या शिखरावर असताना काजोलने लग्न केलं आणि आपलं कामही कमी करत करत थांबवलं. एका सर्वसाधारण भारतीय मुलीचं लग्नाचं योग्य वय पण एका स्टार अभिनेत्रीचा विचार करता काजोलने फारच लवकर लग्न केलं, त्यामुळे काजोलची चित्रपट यादी त्यामानाने लहानच म्हणायची, हे चित्रपट रसिकांचं दुर्दैवच. पुढे ती आपल्या सुखी संसारात इतकी रमली की चित्रपटांकडे तिने पाठच फिरवली. आता तिची मुलं मोठी झाली आहेत, तर तुरळक एखाद्या सिनेमात तिचं दर्शन घडतं.

कोणतीही भूमिका अतिशय ताकदीने पेलणाऱ्या या गुणी अभिनेत्रीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा......भविष्यात तिचे दमदार अभिनयाचे चित्रपट आम्हा चित्रपट रसिकांना बघायला मिळोत, हीच इच्छा... 
 

No comments:

Post a Comment