ये लो मैं हारी पिया हुई तेरी
जीत रे
सुन सुन सुन सुन ज़ालिमा
आज माहीत नाही, गुरु दत्तच्या आर पार या चित्रपटातली गाणीच सारखी डोक्यात येत आहेत आणि त्याबरोबर आठवली ती या सिनेमाची नायिका
"श्यामा". कालच राजेश खन्नाचा स्मृती दिन होता त्यामुळे डोक्यात काकाही होता.
खरं तर श्यामा आणि काका यांचा
एकमेकांशी काहीही संबंध नाही पण काकाची शेवटच्या
दिवसांमधली आर्थिक स्थिती आणि श्यामाची करियर संपल्यावरची आर्थिक स्थिती या दोघांची एकत्र आठवण येण्यास पुरेशी आहे.
काकाने केलेली ती दीन अवस्थेतली पंख्याची जाहिरात, सी ग्रेड चित्रपटात केलेलं काम वगैरे तर सगळ्यांना माहीत आहे. एवढा मोठा सुपरस्टार पण आर्थिक
नियोजनाच्या अभावामुळे ही वेळ त्याच्यावर आली होती. हे झालं काकाचं.
आता ही श्यामा. हिंदी सिनेमातलं कुठलं मोठं नाव वगैरे अजिबात नाही. तिचे
सिनेमे सांगा म्हटल्यावर पटापट ते ही फारसे सांगता येणार नाहीत. तिचा
नवरा त्यामानाने लवकर गेला. पदरात मुलं आणि तिचा स्वतःच्या भविष्याचा विचार
पण तिने हे सगळं व्यवस्थित निभावून नेलं. मुलांची शिक्षणं, लग्नं हे सगळं तिने कोणाकडेही हात न पसरता
नीट पार पाडलं आणि आजही ती कोणावर अवलंबून न राहता जीवन व्यतीत करत आहे. जेव्हा चित्रपटात काम करायची तेव्हा ती मिळणारा
पैसा मुंबईत जागा किंवा घरं यात गुंतवायची. गुंतवणूक म्हणून तिने मुंबईत
बऱ्याच जागा विकत घेतल्या आणि गरजेला याच मुंबईतल्या जागा तिला उपयोगी पडल्या
आणि अजूनही पडत आहेत.
गेलेल्या लोकांबद्दल मला फार
काही बोलायचं नाहीये पण राजेश खन्नासारखे शेवटच्या काळात हातात पैसा नाही असे कलाकार
या चित्रपटसृष्टीत कमी नाहीत आणि राजेश खन्ना तर मोठा स्टार पण त्याला जे
जमलं नाही ते श्यामासारख्या त्यामानाने कमी नाव असलेल्या अभिनेत्रीला
जमलं, हे विशेष.
आज अचानक आर पारच्या गाण्यांपासून
सुरु झालेलं विचारचक्र कालच स्मृती दिन झालेल्या
राजेश खन्नाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत येऊन थांबलं आणि ते इथे लिहावंसं वाटलं.
No comments:
Post a Comment