Tuesday, 28 June 2016

चांगलं यशस्वी काम आणि झाड



कुठलंही चांगलं काम एका दिवसात यशस्वी होत नाही.
 
कुठलंही झाड लावलं की लगेच दुसऱ्या दिवशी त्याची मधुर फळं चाखायला मिळत नाहीत किंवा लगेच ते झाड तुम्हाला गार सावलीही देत नाही...

...तर आधी चांगल्या कामाचं संकल्परूपी बी आपल्या मनात किंवा आत्म्यात पेरावं लागतं. त्याला हिंमत, आत्मविश्वास, धमक, सहनशक्ती अशा खतांचं पोषण द्यावं लागतं आणि त्याबरोबरच अथक परिश्रमांचं पाणी त्याला देत त्याचं सिंचन करावं लागतं.
 
या सगळ्याची सरमिसळ जेव्हा उत्तमरित्या होते तेव्हा कुठे काही वर्षांनी ते झाड तुम्हाला मधुर फळ देतं, गार छाया देतं...!
 
कुठलंही चांगलं काम हे असं या झाडासारखं असतं, त्याला आपल्याला घडवावं लागतं आणि या घडण्याच्या क्रियेसाठी स्वतःला समर्पित करावं लागतं...

तेव्हा कुठे चमकदार यश आपल्या पदरात पडतं..

No comments:

Post a Comment