Thursday, 16 June 2016

आत्मा नसलेलं हायफाय घर

काल  एका परिचितांकडे त्यांचं नवीन घर बघायला गेले होते, तसं वास्तुशांतीचंच आवर्जून बोलावणं होतं पण त्यावेळी आम्ही मुंबईत नसल्याने जायला जमलं नव्हतं. एकदम आलिशान भलामोठा flat, त्याच्या अद्ययावत interior मुळे चांगलाच लक्ष वेधून घेणारा. चांगलं आहे ....................

भला मोठा hall, दिवाणखाना. त्या घरातल्या बाई मला अगदी उत्साहाने hall मधलं interior आम्ही कसं केलं, काय केलं वगैरे सांगत होत्या. तेवढ्यात त्या एका भिंतीजवळ आल्या आणि त्या भिंतीवरची कपाटं, drawers यांची विशेष रचना आणि त्यातलं सौंदर्य दाखवू लागल्या. हे एवढं सगळं त्या भिंतीवर बसवल्यानंतर एक चौकोनी जागा शिल्लक राहिली होती. आता याचं काय करणार म्हणून आम्ही इथे देवघर बनवलंय .बाकी कुठे जागाच नाहीये, देवघर कुठेतरी घरात adjust करायला हवंच होतं आणि ही जागाही फुकट गेली असती नाहे त्यांचं म्हणणं.

नको असलेली आणि घरातून बाहेर हाकलता येत नाहीत अशा  माणसांना कुठेतरी कोप-यात टाकून द्यावं आणि रहा इथे असं सांगावं, अशी काहीतरी भावना, अर्थात दर्शवलेली मला जाणवली आणि त्यांचं ते हवेशीर घरही अचानक कोंडवाडा वाटू लागलं.

आता त्या घरात थांबणं ही माझ्यासाठी फक्त एक औपचारिकता होती.

सगळं घर बघून झालं आणि त्यांनी त्यांचा मोर्चा त्यांनी balcony, खिडक्या येथे लावलेल्या झाडांकडे वळवला. Resorts मधे कशी शोभेची छान छान रंगांच्या फुलांची झाडं लावलेली असतात तशी झाडं त्यांनी लावली होती, रंगीबिरंगी फुलं पण सगळी बिनवासाची. त्यांची मर्जी.

त्यांच्या कुंड्या पहात असताना एक लक्षात आलं, तुळस कुठे दिसत नाहीये. मग त्यानंतर झाडं पाहताना माझी नजर तुळशीलाच शोधत होती, पण त्यांच्या घरात तुळशीलाही जागा नव्हती. काहीतरी खोचकपणे बोलावं, असं फार मनात होतं पण टाळलं. मग त्या आमच्या घरच्या झाडांबद्दल विचारू लागल्या. आमच्याकडे वासाच्या फुलांची झाडं आहेत हे एकंदर त्यांना माझ्या बोलण्यावरून जाणवलं. मला म्हणतात, वासाच्या फुलांचीच झाडं म्हणजे, त्यांना show नसतो. मी पण उत्तर दिलं, हो विकतची फुलं पूजेसाठी पटत नाहीत, शक्य आहे, हौस आहे म्हणून लावली घरी झाडं. आंघोळ करून झाडावरची फुलं तोडायची आणि तबकातच ठेवायची आणि लगेच देवाची पूजा. मला चांगली संधी मिळाली होती ती अजिबात सोडली नाही. म्हटलं आणि हो तुळस पण आहे, चांगली कृष्ण तुळस. छान छोट्याशा तुळशी वृंदावनात लावलेली.

लगेच  अपेक्षित वाक्य आलंच. तुळशीला पण काही show नसतो. हे वाक्य ऐकून माझं डोकं चांगलंच फिरलं. म्हटलं, show ? अहो सगळीकडेच show बघायचा नसतो .तुळस ही पूजनीय आहे आणि एका हिंदू घरात तुळस तर हवीच. एक घर आणि त्या घरची छोटी मोठी बाग तुळशी शिवाय पूर्णच होऊ शकत नाही, म्हणून आमच्याकडे तुळस आहे.  झालं त्यांची बोलती बंद.

आता मला ते घर फारच निर्जीव वाटत होतं. एक असं घर, ज्यात सगळ्या गोष्टींसाठी जागा आहे पण देवांसाठी नाही. घरात भरपूर झाडं लावली आहेत पण त्यात छोटीशी तुळस नाही.

लवकरात लवकर तिकडनं मी काढता पाय घेतला.

कसं समजत नाही लोकांना, त्या ईश्वराची कृपा आहे तोपर्यंत ठीक आहे, एकदा त्यानेच पाठ फिरवली की राजाचा रंक व्हायला, जीवनात संकटांची line लागायला वेळ लागत नाही.

असो ...........

No comments:

Post a Comment