आमच्या इमारतीच्या lift जवळ
छपराला POP केलंय आणि त्यात छोटे छोटे दिवे बसवले
आहेत. त्या दिव्यांच्या खोबणीत चिमण्यांनी घरटी बनवली आहेत. त्यामुळे आमच्या इथे अजूनही मोठ्या प्रमाणावर 'चिमणी दर्शन' घडतं. इमारतीच्या सगळ्या भागात यांचा मुक्त संचार असतो. चिमण्यांची अंडीही जिन्यांमध्ये
बघायला मिळतात. थोडक्यात काय तर आमच्या इमारतीच्या या चिमण्याही कायमस्वरुपी सदस्य आहेत.
आमच्या घराच्या खिडक्या या चिमण्यांचं बागडण्याचं आवडतं ठिकाण. रोज किमान ७-८ तरी चिमण्या येऊन जाणारच. त्यातही रोज ठराविक वेळेला एक चिमणा-चिमणीची जोडी आमच्या खिडकीत येते. बहुतेक करून दोघे एकत्रच येतात. पण क्वचित त्या दोघांपैकी एकच आधी आला/ली तर तो/ती खिडकीच्या grill वर बसून आपल्या जोडीदाराला हाक मारतो/ते, अर्थात चिवचिवाट करूनच. पण हा चिवचिवाट नेहमीपेक्षा वेगळा असतो. त्यातली हाक मारण्याची भावना सहजपणे लक्षात येते.
मग जोडीदार आला की त्यांचं grill वर एकत्र छानपैकी बागडणं सुरू होतं .मधूनच शेजारच्या खिडकीत जातील, तिथे बागडतील, मग परत येतील. सगळं जोडीनं. बागडताना केलेला चिवचिवाट अर्थात वेगळाच. खूप मजा येते बघताना. इतर चिमण्या एकट्या येतात हे समजतं आणि या जोडीचं एकत्र असणंही जाणवतं.
एका खिडकीत मी त्यांच्यासाठी पाणी ठेवते .इथे पाणी आहे हे त्यांना आधी कळायचं नाही पण आता आवर्जून सगळ्या चिमण्या पाणी प्यायला तिथे येतात .चिमण्यांची जोडी पाणी पण एकत्रच पिते.
चिमण्यांचं जीवन जवळून बघण्याची कधी संधी मिळाली नव्हती .पण सध्या चिमणी जोडीचं सहजीवन अनुभवायला मिळतंय. खूपच मस्त वाटतंय.

No comments:
Post a Comment