Tuesday, 28 June 2016

कामवाल्या बाईकडच्या गौरी



आज संध्याकाळी आमच्या पूर्वीच्या कामवाल्या बाईंकडे हळदीकुंकू आणि तीर्थप्रसादाला जायचंय.

खूप स्वच्छ आणि प्रामाणिक बाई, एकदम शांत. नवरा लवकर गेला आणि दोन मुलं. खूप कष्ट उपसलेत हिने. दोन्ही मुलांना जमेल तसं शिकवलं .मुलीचं लग्न झालं, ती सासरी सुखी आहे. मुलाला दहावीनंतर ITI मधे diploma ला घातलं. दहावीच्या सुट्टीत पण मुलाला कुठे रिक्षा चालवायला शिकायला पाठव, कुठे अजून काही शिकव असं चालू होतं. जर मुलगा diploma झाला नाही तर निदान रिक्षा तरी चालवेल, म्हणून. पण मुलगा कसा बसा diploma झाला.

मग mobiles, electronics वस्तूंच्या repairy च्या कामासाठी एका दुकानात कामाला लागला. असं करत करत हळूहळू त्याने स्वतःचं दुकान सुरू केलं .दुकान छान चालू लागलं, तसं तो आईला म्हणाला की तू आता सगळी कामं सोड. फार कष्ट सोसलेस आयुष्यभर. आता तू काम करायची गरज नाही. तिलाही लगेच कामं सोडायला जमलं नाही .नाही हो करत - महिन्यांनी तिने कामं सोडली.

खूप छान चाललंय आता त्यांचं. मुलगा खूप मेहनत घेतोय. कुटुंबात सगळ्यांनाच त्याचं खूप कौतुक आहे. बोलावणं करायला आली तेव्हा हे सगळं सांगतानाही तिच्या डोळ्यात एक चमक होती.

घरी गौरी गणपती आहेत पण हिला करणं शक्य नव्हतं .देवाची कृपा आहे आपल्यावर, त्याची सेवा आपण केली पाहिजे या भावनेने या वर्षीपासून तिने गौरी गणपती बसवायला सुरुवात केली आहे .खरं तर १५-२० घरांचं बोलावणं आहे पण काहीही करून हिच्या घरी मी नक्की जाणार आहे .हिचे आजचे दिवस पाहिले की खूप बरं वाटतं, फार सोसलंय हिनं.

मराठी वृत्तवाहिन्यांवर कुठल्या कुठल्या celebrity न्चे गौरी गणपती दाखवतात, ह्या अशा काबाडकष्ट करून वर आलेल्या गरीब लोकांच्या घरचे गौरी गणपती दाखवले तर इतरांनाही यातून नक्कीच प्रेरणा मिळू शकेल.

No comments:

Post a Comment