Saturday, 25 June 2016

नकोसे पाहुणे.....उन्हाळा



आपल्या घरी आपले आवडते पाहुणे येणार असा निरोप येतो, अर्थातच हे पाहुणे खूप महिन्यांनी येणार असतात. सगळं घर आनंदी होतं. उत्साहाने बेत आखले जातात. हे करायचं. ते करायचं. इकडे जायचं. तिकडे जायचं. खाण्याच्या पदार्थांचीही यादी बनते.... आणि ठरलेल्या दिवशी ते आवडते पाहुणे येतात. घरचे आणि पाहुणे मिळून असा नुसता हाहा....हुहु, दंगा सुरु होतो. सगळे आखलेले बेत पूर्णत्वास जातच असतात आणि तितक्यात दारावरची घंटा वाजते.

दरवाजा उघडला जातो.... आणि दारात उभे असलेले पाहुणे बघून घरातली लोकं आणि सगळेच वैतागतात. घरातली लोकं कुजबूज करायला लागतात, हे पाहुणे आत्ताच तर येऊन गेले ना, आता परत कशाला आलेत ! पण ते नकोसे पाहुणे तोपर्यंत घरात आलेले असतात.

या आलेल्या पाहुण्यांना बघून हवेसे वाटणारे पाहुणेही निघून जातात. आता हे घर, नकोसे आणि हवेसे पाहुणे सध्या बहुतेक करून सगळ्यांच्या घरी सारखेच आहेत. पावसाचा आनंद लुटत असताना मध्येच परत उन्हाळा जो आलाय !

No comments:

Post a Comment