नलिनी जयवंत, ५०-६० च्या दशकातली एक मराठी अभिनेत्री. एकदम 'बोल्ड आणि ब्युटीफुल' म्हणता येईल अशी अभिनेत्री, पण उत्तम
अभिनय गुण असलेली.
या क्षेत्रात आपल्या घरच्या
मुलीने येऊ नये म्हणून तिच्या घरच्यांनी तिला प्रचंड
विरोध केला. अगदी सर्वोतपरी समजावलं पण तिच्यासमोर तिच्या सख्या मामेबहिणीचा म्हणजेच शोभना समर्थचा आदर्श होता आणि घरच्यांचा
टोकाचा विरोध पत्करुन ती या क्षेत्रात आलीच.
नलिनी तिच्या काळच्या अभिनेत्रींपेक्षा
कमी गुणी नव्हती पण प्रसिद्धी मात्र तिच्या वाट्याला कमीच आली आणि आजही नलिनीचं नाव
फारसं कोणी घेतही नाही.
मुळातच अलिप्त, एकटं राहण्याचा स्वभाव आणि नशिबानेही तिच्या नशिबी एकटेपणाच
लिहिला होता.
जीवन के सफर में राही मिलते
हैं बिछड़ जाने को,
और दे जाते हैं यादें तन्हाई में तड़पाने को…
और दे जाते हैं यादें तन्हाई में तड़पाने को…
हे साहिर लुधियानवी यांनी
लिहिलेलं आणि नलिनीवरच चित्रीत झालेलं गाणं पण जणू काही
तिच्यासाठी तिच्या आयुष्याचं शब्दांकन करण्यासाठी साहिर यांनी लिहिलं असावं असंच हे गीत...

No comments:
Post a Comment