Friday, 24 June 2016

पुस्तकांचं घरकुल



घरात पुस्तकांसाठी राखून ठेवलेली जागा संपली की पुस्तकं कुठे कुठे घरातली जागा पटकवतात. पण असं किती काळ चालणार ! कधीतरी या कुठे कुठे अशा जागाही संपतात. तेव्हा खास पुस्तकांसाठी वेगळ्या घरकुलाला पर्याय रहात नाही. तेव्हा घरातला एक कोपरा या पुस्तकांच्या घरकुलासाठी राखून ठेवावाच लागतो.

आपणच जमवलेला हा अनमोल खजिना त्यांच्या घरात सजवताना आपण आपल्या हातांनी सजवलेलं आपलं घरकुल आठवतं. त्यावेळी आपल्या घराने आनंद दिला तोच आनंद हे पुस्तकांचं घर सजवताना होतो. एरवी इकडे तिकडे असलेली पुस्तकं त्यांच्या नवीन घरी रहायला गेली की त्यांचं ते भरलेलं घर बघून फार फार मानसिक समाधान मिळतं.

सगळी पुस्तकं एकत्र डोळ्यांसमोर दिसत असतात आणि त्यावेळी आपण किती श्रीमंत आहोत याची जाणीव होते.

अक्षय होणा-या खजिनांचा विचार केला तर पुस्तक खजिन्याचा क्रमांक फार वरचा आहे, जो आपल्या प्रत्येक दिवसात आपली साथ सोडत नाही. निराश मन प्रफुल्लित करायला पुस्तकं हा एक आदर्श सोबती.

आज माझ्या घरकुलात अनमोल अशा पुस्तकांचं घरकुल सजवताना जाणीव झाली, खरंच आपण किती श्रीमंत आहोत
! 

No comments:

Post a Comment