Friday, 24 June 2016

पनीर आणि आयुष्य



आज सकाळी लक्षात आलं की छोट्या पातेल्यात थोडंसं दूध ओट्यावरच राहिलं. काल रात्री फ्रिजमध्ये ठेवायचं राहूनच गेलं. एवढा उन्हाळा आहे, कसलं रहायला ते, नासलं. तेव्हा त्याचा काहीच उपयोग नव्हता, पण त्यावेळी डोक्यात आलं. कसं आहे ना, हे नासकं दूध, पण ह्याचंही पनीर होऊ शकतं. नासक्या दुधाचा सद्उपयोग होऊ शकतो.



आपल्या आयुष्याचंही असंच आहे ना, कधी कोणावर असे प्रसंग येतात की वाटतं, आता संपलं सगळं, आता या संकटातून बाहेर पडणं केवळ अशक्य. थोड्याअधिक प्रमाणात सगळ्यांवर बरे वाईट प्रसंग येत असतातच की, पण जे दुधाचं, तेच आयुष्याचं.



ज्यांना आयुष्यातही नासक्या दुधाचं पनीर बनवता येतं, तोच खरं आयुष्य जगाला, आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला, नाही का ?

No comments:

Post a Comment