का तुम्ही आपल्या मुलाला या असल्या हलक्या क्षेत्रात
आणत आहात ! आपलं आयुष्य कसं बसं या हलक्या क्षेत्रात जाईल, पण मुलाला तरी मानाने जगू द्या.................ही एका आईची भावना. त्या काळी सनई
वादकांना विवाह समारंभात बोलावलं जाई. लांब अंगणात या लोकांनी बसायचं. आपली कला पेश करायची आणि तिथूनच परत जायचं. अंगणापर्यंतच यांची सीमा, त्यामुळे या क्षेत्राला कमी दर्जाचं समजलं जाई. पण वडलांनी पक्क ठरवलं होतं की
आपला मुलगा सनई वादकच बनणार, त्यांचं घराणंच या क्षेत्रातलं. हा छोटा मुलगा
म्हणजेच उस्ताद बिस्मिल्लाह ख़ाँ.
ख़ाँ साहेबांनी सनईला जगभरात प्रतिष्ठा मिळवून दिली. खरं सांगायचं तर ख़ाँ साहेबांनी छेडलेल्या सुरांमुळे सनई हे वाद्य पुनीत झालं.
ख़ाँ साहेब मूळचे बिहारचे पण वयाच्या सहाव्या वर्षी वाराणसीला आले. गंगा नदीच्या काठी रियाझ करायचे. त्यांना कोणीतरी सांगितलं की सनई वाद्य वाजवायचं तर आपल्या श्वासांवर नियंत्रण हवं आणि त्यासाठी व्यायाम आवश्यक, शरीर कमावणं आवश्यक. व्यायाम करायचा तर त्यासाठीही ते भल्या पहाटे गंगा किनारी येत.
गंगा मातेला त्यांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान होतं. ते मातेचे उपासक होते. त्यांच्या मते ते जे कोणी होते ते या गंगामैय्यामुळेच. स्वतः शिया पंथीय असूनही ते सरस्वती देवीचे भक्त होते. वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात ख़ाँ साहेब अधिकृत सनई वादक होते. त्यांच्या सुरांशिवाय बाबा विश्वनाथांची पूजा पूर्ण होत नसे.
१५ ऑगस्ट १९४७, आपला तिरंगा लाल किल्ल्यावर फडकत होता आणि त्यावेळी ख़ाँ साहेबांच्या सनई सुरांनी वातावरण मंगलमय केलं होतं. त्यानंतर प्रथाच पडली, १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या भाषणानंतर ख़ाँ साहेबांचं सनई वादन हे ठरलेलं. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येलाही ख़ाँ साहेबांचं लाल किल्ल्यावर अतिशय हृदयस्पर्शी सनई वादन झालं होतं.
दिल्ली, मुंबई, लखनऊ, वाराणसी अशा आकाशवाणी केंद्रांवरच्या विविध भारतीच्या प्रसारणाची सुरुवात ख़ाँ साहेबांच्या सनई वादनानेच होत असे.
जगभरातील सर्वश्रेष्ठ सनई वादक म्हणून ख़ाँ साहेबांचं नाव घेतलं जातं. त्यांनी भारताबाहेरही अनेक कार्यक्रम केले. अमेरिकेने त्यांना अतिशय सन्मानपूर्वक अमेरिकेत वास्तव्य आणि तिकडचं नागरिकत्त्व देऊ केलं होतं. त्यांना अमेरिकन सरकारतर्फे मोठी बिदागीही मिळणार होती. त्यावर ख़ाँ साहेब म्हणाले होते, मी तुमच्या देशात येऊ ? तुम्ही मला मोठं मानधनही देत आहात. चांगलं आहे. पण मी कसा येऊ ? या गंगामैय्याची छत्रछाया मला तुमच्या देशात कशी मिळणार ? तुमच्या देशात गंगामैय्याच नाही मग मी तिकडे येऊन तरी काय करू ? ................... आणि अतिशय आदराने अमेरिकेचा प्रस्ताव ख़ाँ साहेबांनी नाकारला होता.
संगीत क्षेत्रात ज्यांना संत संगीतकार म्हणून संबोधलं जातं, ज्यांच्या सनईच्या स्वर्गीय सुरांशिवाय कोणतंही मंगल कार्य, मंगल दिवस अपूर्ण आहे अशा भारतरत्न पैगंबरवासी उस्ताद बिस्मिल्लाह ख़ाँ या महान दैवी आत्म्यास विनम्र अभिवादन.....!!!!

No comments:
Post a Comment