Saturday, 18 June 2016

परशुराम जयंती



भगवान विष्णूंचा सहावा अवतार

सप्त चिरंजीवांपैकी एक

अती पराक्रमी

संपूर्ण कोकण भूमीची आद्य देवता
‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ या ज्ञातीचे निर्माणकर्ते व आद्य पुरुष तसेच प्रथम देवता
ब्राह्मण असूनही, या ज्ञातीच्या गुणांबरोबरच क्षत्रियांचे सर्व गुण अंगी असणारी देवता
जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचे पुत्र ‘भार्गव’
गुरू श्रीशंकर यांच्याकडून परशु मिळाल्यानंतर झाले ‘परशुराम’

इथे एक मुद्दा नमूद करावासा वाटतो, असा एकंदर गैरसमज आहे भारतीय समाजात की, परशुरामांनी २१ वेळा पृथ्वी क्षत्रिय मुक्त केली किंवा पूर्ण नाश केला. पण हे पूर्ण चुकीचे आहे. त्यांनी फक्त हैहेय म्हणजेच अधर्मी क्षत्रियांचा २१ वेळा पूर्ण नाश केला. ह्याचे दाखले पुराणात आढळतात. एवढंच कशाला जर कोणी सविस्तर रामायण आणि महाभारत वाचलं असेल तर त्यातही ह्याचे पुरावे वाचायला मिळतात.  

|| जय परशुराम || 

(प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांनी रेखाटलेलं परशुरामांचं चित्र)




चितेतून जन्माला घालून हिंदू धर्मात समाविष्ट करणाऱ्या आणि माझ्यासारख्या अनेक चित्पावनांचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या भगवान परशुराम यांना मानाचा मुजरा...

सागराला आपल्या सामर्थ्याने मागे सरकवून "कोकणा"सारखी स्वर्गभूमी निर्माण करणाऱ्या आदी पुरुष भगवान परशुराम यांना त्रिवार वंदन.

सगळं संपलं. आता काहीही उरलं नाही अशी परिस्थिती समोर असताना त्या परिस्थितीवर अतिशय कष्ट करून मात करण्याचं बाळकडू आपल्या कोकणवासियांना देणाऱ्या भगवंतांना नमन.

रेणुका माता आणि सप्तर्षी ऋषी जमदग्नी पुत्र भगवान परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...

No comments:

Post a Comment