Tuesday, 5 July 2016

धूप महत्त्व



सध्या डेंग्यूने थैमान घातलंय. आपल्या घराला डेंग्यूच्याच नाही तर कुठल्याही प्रकारच्या डासांपासून दूर ठेवण्याचा एक पारंपारिक मार्ग.
 
साधारणपणे संध्याकाळी अंधार पडायला लागला की डास घरात येतात. तीच दिवेलागणीची वेळ असते. यावेळी देवाजवळ दिवा लावण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर खरं तर धुपारती करण्याचीही पद्धत आपल्या पूर्वजांनी घालून दिली आहे. धुपारती केल्याने घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि तिची जागा सकारात्मक शक्ती घेते. धूप वातावरण पवित्र, स्वच्छ करतो. त्यामुळे साहजिकच मन प्रसन्न होतं. घरातलं वातावरणही उत्साही होतं.
 
याबरोबरच, धुपाच्या धुरामुळे घरात डास येत नाहीत. त्यामुळे उगाचच घरात त्या गुड नाईटच्या बाटल्या जाळायचीही गरज भासणार नाही. हे स्वानुभवाने लिहीत आहे.
 
पण धूप म्हणजे नैसर्गिक धूप, ज्याचे खडे मिळतात. धुपाच्या कांड्या मिळतात तो धूप नाही.
आपले पूर्वज खूप हुशार होते. संध्याकाळी धुपारती केल्याने काय काय फायदे होऊ शकतात याचा विचार करूनच त्यांनी यावेळी धुपारती करण्याची पद्धत पाडली असणार !



No comments:

Post a Comment