आज “तुकाराम बीज”. आज संत तुकाराम सदेही वैकुंठाला गेले. तुकारामांना शतश: प्रणाम
आणि साष्टांग दंडवत. त्याचेच स्मरण म्हणून सर्व वारकरी हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून
साजरा करतात. कित्येक दिवस आधीपासूनच देहू येथे विविध ठिकाणी गाथा पारायण, हरिनाम सप्ताह
यासारखे कार्यक्रम चालू होतात. त्यामुळे देहू हा परिसर आधीपासूनच गजबजलेला असतो. लाखोंच्या
संख्येनी भाविक हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी दरवर्षी देहू येथे जमतात.
ज्या भक्तीभावाने वारकरी पंढरपूरची वारी करतात, तेवढ्याच भक्तीभावाने वारकरी ‘तुकाराम
बीज’ही साजरी करतात.
तुकाराम महाराज नांदुरकीच्या झाडाखाली कीर्तनाला बसलेले असताना, महाराजांना वैकुंठाला
नेण्यासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णू गरूड घेऊन देहूला आले आणि त्यांना सदेह वैकुंठाला
घेऊन गेले. गरूड परत जात असताना त्याचा पाय ह्या नांदुरकीच्या झाडाला लागला आणि दर
तुकाराम बीजेला बरोब्बर दुपारी १२ वाजता या झाडाची फांदी हलताना दिसते. खास ही हलणारी
फांदी बघण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली लोकं तेथे असलेल्या वैकुंठगमन
मंदिराजवळ गर्दी करतात.
इंद्रायणी नदीचे दोन्ही काठ हा सोहळा बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी आलेल्या भाविकांच्या
गर्दीने दुथडी भरून वाहू लागतात.
आज “तुकाराम बीज”. आज संत तुकाराम सदेही वैकुंठाला गेले. तुकाराम महाराजांना शतश:
प्रणाम आणि साष्टांग दंडवत. त्याचेच स्मरण म्हणून सर्व वारकरी हा दिवस ‘तुकाराम बीज’
म्हणून साजरा करतात.
कित्येक दिवस आधीपासूनच देहू येथे विविध ठिकाणी गाथा पारायण, हरिनाम सप्ताह यासारखे
कार्यक्रम सुरू होतात. या कार्यक्रमांना भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात, त्यामुळे
हा परिसर आधीपासूनच पूर्णपणे गजबजून जातो.
आज ‘तुकाराम बीज’ पण काल रात्रीपासूनच भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. आजचा
सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक देहू येथे
जमतात, आणि महत्त्वाचं म्हणजे वर्षागणिक भाविकांचा हा उत्साह वाढतंच आहे. फक्त राज्यातूनच
नाही तर देशभरातून तसेच परदेशातूनही भाविक तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी हजेरी
लावतात.
ज्या भक्तीभावाने वारकरी पंढरपूरची वारी करतात, तेवढ्याच भक्तीभावाने वारकरी ‘तुकाराम
बीज’ही साजरी करतात.
आजच्या दिवशी देहूतील ‘वैकुंठ गमन’ मंदिरात पहाटे महापूजा आयोजित केली जाते. त्यानंतर
तेथील नांदुरकीच्या झाडाखाली प्रथेप्रमाणे कीर्तनाचा कार्यक्रम असतो. त्यानंतर जमलेल्या
भाविकांच्या जनसागराकडून त्या झाडावर फुले उधळली जातात.
तुकाराम महाराज नांदुरकीच्या याच झाडाखाली कीर्तनाला बसलेले असताना, महाराजांना
वैकुंठाला नेण्यासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णू गरूड घेऊन देहूला आले होते आणि त्यांना
सदेह वैकुंठाला घेऊन गेले. गरूड परत जात असताना त्याचा पाय ह्या नांदुरकीच्या झाडाला
लागला आणि दर ‘तुकाराम बीजे’ला बरोब्बर दुपारी १२ वाजता या झाडाची फांदी हलताना दिसते.
खास ही हलणारी फांदी बघण्यासाठी दूर दूरहून आलेले भाविक या वैकुंठगमन मंदिराजवळ गर्दी
करतात.
इंद्रायणी नदीचे दोन्ही काठ हा सोहळा बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी आलेल्या भाविकांच्या
गर्दीने अक्षरशः दुथडी भरून वाहू लागतात.

No comments:
Post a Comment