मुघल-ए-आज़म, हिंदी सिनेमाच्या इतिहासातल्या दोन सिनेमांपैकी एक असा सिनेमा की त्याला बनायला सर्वाधिक काळ लागला, या सिनेमाला हिंदी सिनेमाच्या इतिहासातला
सर्वोत्तम सिनेमा म्हटलं जातं. दुसरा सिनेमा पाकिज़ा.
तब्बल १७-१८ वर्षे जिद्दीने
या सिनेमासाठी झटल्यावर हा एक ऐतिहासिक सिनेमा तयार झाला.
के. असिफ यांची प्रचंड चिकाटीच या सिनेमाला पूर्णत्वापर्यंत नेऊ शकली. या १८ वर्षात हा सिनेमा बनताना अनेक संकटं आली, या संकटांचा एकेक प्रसंग
आज दंतकथा बनून राहिला आहे. त्या गोष्टी वाचताना भारावल्यासारखं होतं. अर्थात इतकी कष्टाळू, जिद्दी
लोकं त्या काळी होती म्हणूनच संकटांवर मात करत
हा सिनेमा बनू शकला. पाण्यासारखा पैसा खर्च झाला. सिनेमाचा निर्माता
हवालदिल झाला. त्याची मानसिक अवस्था एवढी बिकट झाली की त्या अवस्थेत
तो असिफ यांना मोठमोठे शाप देऊ लागला.
असे अनेक त्रास सहन करत के.
असिफ यांनी जिद्दीने सिनेमा पूर्ण केला आणि प्रदर्शित
केला. मुंबईच्या मराठा मंदिरमध्ये या सिनेमाचा प्रिमिअर झाला. फर्स्ट डे फर्स्ट शोच्याही आधीच पुढच्या सात आठवआठवड्यांचे
सगळेच्या सगळे शो अॅडव्हान्समध्येच हाऊसफुल्ल होते. तिकिटांच्या काळा
बाजारीला तर कुठली सीमाच नव्हती. हा सिनेमा प्रदर्शित झालेल्या प्रत्येक
थिएटरमध्ये सगळेच्या सगळे खेळ सलग तीन वर्ष अखंड चालले. हा विक्रम आजवर मोडला
गेलेला नाही.
सिनेमा प्रचंड चालला. या सिनेमाचा
तिकीट खिडकीवरचा रेकॉर्ड नंतर शोलेने मोडला.
के. आसिफ यांना हा सिनेमा त्या काळात विशेष तंत्रज्ञान वापरून रंगीत बनवायचा होता. प्यार किया तो डरना क्या हे गाणं त्यांनी
रंगीत बनवलंही पण इतर गणितं जुळून येऊ शकली नाहीत. पण नंतर सिनेमाच्या निर्मात्याच्या नातवाने २००४ मध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून सिनेमा रंगीत
बनवला. आजच्या मल्टिप्लेक्सच्या काळातही सिनेमाने सिल्वर ज्युबिली साजरी
केली.
या सिनेमाच्या
नंतरही असिफला अजून एक भव्य सिनेमा बनवायचा होता. सिनेमा निर्मितीचं
कामही सुरु झालं होतं पण तो पूर्ण होऊ शकला नाही.
हे असे के. असिफसारखे कलाकार
सारखे सारखे जन्म घेत नाहीत. आज असिफ यांची जयंती, या निमित्ताने
हे त्यांचं एक स्मरण.
No comments:
Post a Comment